हवेची गुणवत्ता
  पाण्याची गुणवत्ता
  ध्वनी प्रदूषण
  वातावरण शुद्धीकरणाचे तंत्रज्ञान व हवामानातील बदल
  कायदे विषयक बाबी
  इतर विषय त्यासंबधातील माहिती
  अहवाल/दस्तऐवज
  उद्योगाची सांखिकी माहिती
घातक घनकचरा
जैव वैद्यकीय घनकचरा
नागरी घनकचरा
सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र
औष्णिक वीजकेंद्रातून बाहेर पडण-या राखेचा पुर्नउपयोग
प्लॅस्टीक कचरा
ईलेक्ट्रॉनिक कचरा
संबंधित विषय व माहिती - पर्यावरण विषयक नियोजन
 
विशेष पर्यावरण विषयक नियोजन कार्यक्रम (एस इ पी पी)
 
नियोजनबध्द व शाश्वत विकासाद्वारे पर्यावरणाचे त्याच्या स्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी विशेष पर्यावरण विषयक नियोजन कार्यक्रम तयार केला होता. उद्योगांच्या जागांसाठी जिल्हा निहाय पर्यावरणाचे मुल्यमापन करण्यासाठी हा कार्यक्रम 1995 मध्ये सुरु करण्यात आला. जरी सुरुवातीला हा कार्यक्रम उद्योगांना जागा पुरविण्यासाठी असला तरी, नंतर त्याचा विस्तार करण्यात येऊन त्याद्वारे पर्यावरणविषयक माहिती, नागरी क्षेत्रे/खाणी/पर्यटन / धार्मिक स्थळे इत्यादींची पर्यावरण विषयक सुधारणा यांची माहिती गोळा करण्यात येते.

एप्रिल 1997 ते जून 2003 मध्ये जागतिक बँकेने निधी पुरविलेल्या पर्यावरणविषयक व्यवस्थापन क्षमता बांधणी तंत्रज्ञान सहायता प्रकल्पांअंतर्गत हा कार्यक्रम विस्तारित करण्यात आला. या कार्यक्रमाचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने समन्वयने केले होते. या कार्यक्रमाची कामे, विविध राज्य, प्रदूषण नियंत्रण मंडळांनीच इतर अंमलबजावणी एजन्सींनी कार्यान्वीत केली होती. या कार्यक्रमास, इंडो-जर्मन उभयपक्षी कार्यक्रमांतर्गत जर्मन तंत्रज्ञान सहकार्याकडून (जी टी झेड) तांत्रिक सहाय मिळते. मानव संसाधन विकास कार्यक्रम (प्रशिक्षण कार्यक्रम) हाती घेण्यासाठी जर्मनीच्या सी डी जी कडून (आता,  Invent असे संबोधले जाते) देखील मदत मिळते. मंडळाने हाती घेतलेले कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत.

औद्योगिक जागांचे जिल्हा स्तरिय क्षेत्रिय नकाशे :
      कमीत-कमी पर्यावरणविषयक परिणाम / जोखीम असलेल्या जागा निश्चित करता याव्या म्हणून उद्योगांच्या प्रदूषणक्षम जागा निश्चित करण्याच्या दृष्टीने उद्योगांच्या प्रदूषणक्षमतेसह पर्यावरणाच्या संवेदन क्षमतेशी अंतर-संबंधित असलेला अभ्यास करणे.

जिल्हा स्तरिय औद्योगिक जागांची मार्गदर्शकतत्वे :
      पर्यावरणदृष्टी संवेदनक्षम असलेल्या उद्योगांची स्थापना करण्याकरिता टाळलेल्या प्रक्षेत्रांबाबत / क्षेत्रांबाबत किंवा जल व वायु प्रदूषकारी उद्योगांची स्थापना करण्यासाठी संभाव जिल्हा क्षेत्रांमध्ये निर्बंधित केलेल्या प्रक्रिया किंवा कार्ये करण्याबाबत आणि प्राधान्य असलेल्या जिल्हयांसाठी पर्यावरणदृष्टया संवेदनक्षम असलेल्या टाळावयाच्या प्रेक्षका/क्षेत्रांव्यतिरिक्त, जिल्हामधील अन्य कोणत्याही ठिकाणी ज्या प्रक्रिया करता येतील त्या प्रक्रिया करण्याबाबत जिल्हा स्तरिय औद्योगिक जागांची मार्गदर्शकतत्वे सुस्पष्टपणे माहिती विषद करतात. उद्योगांची स्थापना करण्याच्या जिल्हा स्तरिय औद्योगिक नकाशाची अंमलबजावणी करताना, ही मार्गदर्शकतत्वे मदतगार ठरतील.

जिल्हा पर्यावरणविषयक नकाशे :
जिल्हा पर्यावरणविषयक नकाशे, हे नकाशे, मजकूर व सांख्यिकी आकडेवारी या स्वरुपात पर्यावरणाशी संबंधित असलेली माहिती संकलीत करतील. या नकाशांमध्ये सर्वसाधारण / भौतिक वैशिष्टये, भूपृष्ठ/भूजल वैशिष्टये, पर्यावरण दृष्टया संवेदनक्षम असलेली प्रक्षेत्रे, प्रदूषणाचे प्रमुख स्त्रोत याबाबतच्या नकाशांचा समावेश असेल. हे नकाशे 1:250,000 या प्रमाणात असतील.

राज्य पर्यावरणविषयक नकाशे :
राज्य पर्यावरणविषयक नकाशे हे, नकाशे, मजकूर व सांख्यिकी आकडेवारी या स्वरुपात पर्यावरणाशी संबंधित असलेली माहिती संकलीत करतील. या नकाशांमध्ये, प्रशासकीय सीमा. मोठया वसाहती, परिवहन जाळे, इत्यादीसारखी सर्वसाधारण वैशिष्ठये अंतूर्भूत असतील, राज्याच्या भौतिक वैशिष्टयांमध्ये भूमिवापर, प्राकृतिक भूगोल, जमिनीची क्षमता, इत्यादी घटकांचा समावेश होतो. भूपृष्ठ / भूजल वैशिष्टयांमध्ये, जलनि:सारण पध्दती, वापर, दर्जा, प्रवाह व डोंगरमाथा इत्यादी घटकांचा समावेश होतो. संवेदनक्षम प्रक्षेत्रांमध्ये राज्यातील प्रदूषणाचे प्रमुख स्त्रोत जैव विविधता विनिर्दि करणारे पर्यावरणदृष्टया संवेदनक्षम असलेले प्रक्षेत्र, जमिनीचा     वापर याचा समावेश होईल.

राज्य स्तरीय औद्योगिक जागांची मार्गदर्शकतत्वे :
राज्य स्तरिय औद्योगि जागांच्या मार्गदर्शकतत्वांमध्ये टाळावयाची क्षेत्रे आणि उद्योग स्थापन करण्यासाठी मान्यता मिळण्यासाठी अनुसरण करावयाचे नियम / मानके / कार्यपध्दती

धार्मिक स्थळांचे पर्यावरण सुधारणा नियोजन:
महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे ही, प्रामुख्याने लहान शहरांमध्ये किंवा नद्यांच्या किना-यावर स्थित आहेत. उत्सवाच्या वेळी किंवा धार्मिक प्रसंगी येणा-या व्यवस्थापन करण्याची पुरेशी पायाभूत सुविधा स्थानिक प्राधिकरणांकडे नसते. प्रसंगानुरुप एखाद्या छोटया ठिकाणी, प्रचंड प्रमाणात लोक एकत्र आल्यामुळे त्याचा पर्यावरणावर दाब पडून वायु, जल, ध्वनि आणि घन कच-याचे प्रदूषण होऊ शकते. या समस्येचे गांभीर्य विचारात घेऊन येणा-या व्यक्तींसाठी ही ठिकाणे पर्यावरण हिताची व्हावे यादृष्टीने मंडळाने महाराष्ट्रातील धार्मिक ठिकाणे निश्चित केली आहे.

 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामधील क्षेत्रिय नकाशा प्रकल्पाची स्थिती :
 
अ.क्र. प्रकल्प जिल्हे प्रकल्प कामाची स्थिती
1 उद्योग स्थापन करण्याचे क्षेत्रिय नकाशे
रत्नागिरी
पूणे 
औरंगाबाद
पूर्ण
पूर्ण
पूर्ण
2 जिल्हा स्तरिय जागांची मार्गदर्शकतत्वे (डीएलएसजी)
रत्नागिरी
पूणे
औरंगाबाद
पूर्ण
पूर्ण
पूर्ण
3 जिल्हा पर्यावरण विषयक नकाशे (डी इ 9)
पूणे
औरंगाबाद
रत्नागिरी
पूर्ण
प्रगतीपथावर
प्रगतीपथावर
4
राज्य पर्यावरणविषयक महाराष्ट्र
प्रगतीपथावर
5 नकाशे (एस इ 9)
राज्य स्तरीय औद्योगिक जागांची मार्गदर्शकतत्वे
(एस एल आय एस जी एल)
शनि शिंगणापूर, शिर्डी, देहू-आळंदी प्रगतीपथावर
 
 
image
 
वेबसाइट व्यवस्था: पर्यावरण माहीती केन्द्र, महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळ आरोग्य आणि पर्यावरणवेबलिंक्ससतत विचारले जाणारे प्रश्नसंपर्क डिस्क्लेमर साइट मॅप