(1) रिसर्च फाऊंडेशन फॉर सायंस, टेक्नॉलॉजी एन्ड नॅचरल रिसोर्सेस पॉलिसी यांनी भारतीय संविधानाच्या कलम 32 अन्वये सर्वोच्य न्यायालयाकडे घातक टाकावू पदार्थांची डंपिंग करुन व त्याद्वारे गंभीर व न भरून येणारी हानि करून आणिबाणीची स्थिती निर्माण केली त्यामुळे पर्यावरणाची, प्राण्यांच्या व मानवांच्या आरोग्याची अतोनात हानी झाली अशी याचिका (नागरी) क्रमांक 657 वर्ष 1995 द्वारे दाखल करून भारतीय संविधानाच्या कलम 14 व 21 चे उल्लंघन होत असल्याची तक्रार केली.
आरंभिक नियम 1989 नुसार घातक टाकावू पदार्थांची सूची तयार करण्यासाठी केलेल्या कामाची संपूर्ण माहिती देत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तत्कालिन प्रधान वैज्ञानिक अधिकारी डॉ. एस.आर. चौधरी यांच्या द्वारे आपले पहीले शपथ पत्र दिनांक 10/6/1997 रोजी दाखल केले. जिल्हा पातळीवर व्यापक सर्वेक्षण करण्यात आले होते तसेच आवश्यक अटी व नियमांसह घटकांना अधिकृतता देण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्यामध्ये घातक टाकावू पदार्थांची निर्मिती व हाताळणी करणारी अशी 3427 घटक असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शोधून काढले. 3427 घटकां पैकी, घरो-घरी सर्वेक्षण करुन अधिकृतता प्राप्त केलेल्या मध्ये 3013 घटकांचा समावेश, 414 घटकांना पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 च्या कलम 5 अंतर्गत बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विल्हेवाटीच्या सुरक्षित ठिकाणांच्या उपलब्धतेची खात्री, घातक टाकावू पदार्थांची विल्हेवाट त्या सुरक्षित ठिकाणी करण्यासाठी उद्योगांनी उचललेली पाऊले या विषयी विस्तृत सर्वेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने समयबद्ध कार्यक्रम प्रस्तुत केला आहे.
घातक टाकावू पदार्थ नियम, 1989 नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये घातक टाकावू पदार्थांच्या सुरक्षित व वैज्ञानिक विल्हेवाटीसाठी ठिकाणे तात्काळ शोधण्याची बाब लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्र. ईएनव्ही-1096/सी आर.19/टीसी.2 दिनांक 29/10/1996 व 12/3/1997 द्वारे योग्य ठिकाण शोधण्यासाठी, एजेन्सीच्या रुपाने एम.आय.डी.सी ची घोषणा केली आहे. व्यक्तिगतरित्या एखाद्या घटकाचे घातक टाकावू पदार्थांच्या विल्हेवाटीचे ठिकाण दिसल्यास त्या घटकाला त्यांच्या आवारात घातक टाकावू पदार्थांची विल्हेवाट लावण्याचे सांगीतले जाईल.
महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय क्र.
ईएनवी - 1095/सी.आर.12/टीसी 2, दिनांक 19/09/1996 द्वारे पाताळगंगा औद्योगिक वसाहत येथील ठिकाणाच्या संबंधात अधिसूचना जारी केली आहे, त्यापैकी 7 ठिकाणांची निवड घातक टाकावू पदार्थांच्या विल्हेवाटी साठी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवीकरण, मंडळाच्या वर्तमान प्रयोगशाळांचा विकास व राज्यातील घातक टाकावू पदार्थांचे विश्लेषण व सनियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी 6 क्षेत्रीय प्रयोगशाळा स्थापन करणे यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. अधिकृततेच्या अनुपालनाचे प्रभावी संनियंत्रण निश्चित करण्यासाठी मंडळाने 7 भ्रमण संनियंत्रण वाहने सुद्धा खरीदी केली आहेत. मंडळाने दूरदृष्टि ठेवून बनविलेली कृती योजना, पर्यावरण व वने मंत्रालय, भारत सरकार यांचे कडे पाठविली आहे.
निरी (एनईईआरआय) ने महाराष्ट्रामध्ये घातक टाकावू पदार्थांची निर्मिती करणाऱ्या घटकांची सूची न देता आपल्या मसुदा अहवालामध्ये 8545 घटकांची संख्या दर्शविली आहे. निरीने संमती साठी आलेली आवेदने व संमती पत्रांचे केलेल्या निरीक्षणाच्या आधारावर उक्त सूची तयार केली असून प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या आधारावर तयार केलेली नाही.
प्रत्येक बाबींचे निरीक्षण करुन त्या आधारावर सूची तयार करण्यात आलेली नाही.
गृहितकांच्या आधारावर अंदाज वर्तवून घटकांची संख्या दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे, घातक टाकावू पदार्थांची निर्मिती करणाऱ्या घटकांची सूची तयार करण्यासाठी मप्रनिमं स्वत:
हून कार्य करणार आहे. मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक सूचना जारी केल्या नंतर, वर्ष 1997 मध्ये मंडळाची कार्यालये व औद्योगिक संघटनाशी संपर्क साधून मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंडळाच्या कर्मचाऱ्यां कडून व्यापक क्षेत्र सर्वेक्षण करुन माहिती संग्रहित केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये घातक टाकावू पदार्थांची निर्मिती करणाऱ्या घटकांचे जिल्ह्यानुसार विवरण त्यावेळेस तयार केले होते, ते पुन्हा एकदा इथे देत आहोत: