हवेची गुणवत्ता
  पाण्याची गुणवत्ता
  ध्वनी प्रदूषण
  वातावरण शुद्धीकरणाचे तंत्रज्ञान व हवामानातील बदल
  कायदे विषयक बाबी
  इतर विषय त्यासंबधातील माहिती
  अहवाल/दस्तऐवज
  उद्योगाची सांखिकी माहिती
घातक घनकचरा
जैव वैद्यकीय घनकचरा
नागरी घनकचरा
सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र
औष्णिक वीजकेंद्रातून बाहेर पडण-या राखेचा पुर्नउपयोग
प्लॅस्टीक कचरा
ईलेक्ट्रॉनिक कचरा
 
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
 
वायु प्रदूषणाची कारणे काय आहेत ?
वायु प्रदूषण हे मुख्यत्वे, वाहतूक, अचल स्त्रोतांमध्ये होणारे इंधनाचे दहन, कोळसा, लाकुड, वाळलेले गवत यांसारख्या जीवाश्न इंधनाचे जळण, आणि बांधकाम कार्य याद्वारे होते. मोटार वाहने कार्बन मोनॉक्साईड (co), हायड्रोकार्बन्स (HC) व नायट्रोजन ऑक्साईडची (NO) उच्च पातळी निर्माण करतात. बांधकाम कार्ये, खराब रस्ते व जीवाश्म इंधनांचे ज्वलन, धुळीच्या (पार्टीक्युलेट मॅटर) प्रदूषणासाठी जबाबदार आहेत. निवासी व वाणिज्यिक कार्ये देखिल वायु प्रदूषणास हातभार लावतात.
वायु प्रदूषण कसे कमी करता येईल?
सुस्थितीत असलेली वाहने चालवून, शक्य असेल तेथे पायी चालून, सायकलचा वापर करुन व सार्वजनिक प्रवासी साधनांचा वापर करुन, तुम्ही वायु प्रदूषण कमी करु शकता. टाकाऊ पदार्थ, केरकचरा व वाळलेले गवत व पाने जाळण्याचे थांबवा. झाडे लावा आणि पर्यावरण हिताची नसलेल्या उत्पादनांची खरेदी टाळा. वायु प्रदूषण कायद्यांना पाठींबा द्या व त्यांचे पालन करा. जेथे आपण राहतो तेथील वातावरण स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यामध्ये एकमेकास मदत करा.
 
वायु प्रदूषणाचे परिणाम कोणते ?
नित्कृष्ट दर्जाच्या हवेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. प्रामुख्याने, वायु प्रदूषणाचा, शरीराच्या श्वसन यंत्रणेवर आणि हृदय रक्त यंत्रणेवर परिणाम होतो. जरी वायु प्रदूषणासंबंधी व्यक्तिगत प्रतिक्रिया हया प्रदूषकांच्या प्रकारावर अवलंबून असल्या तरी, त्यामुळे व्यक्त होईल इतपत व्यक्तीस धोका निर्माण झाला आहे. वायु प्रदूषणामुळे दीर्घ कालीन आरोग्याच्या समस्या उदभवतात. वायु प्रदूषणामुळे उद्भवलेल्या आरोग्य समस्येने, श्वसन क्रियेत अडचणी येणे, दमा, खोकला यांसारखे श्वसन व हृदयासंबंधीची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
धुके म्हणजे काय?
जेव्हा हवा इतकी थंड असते की, ती तिचे संपूर्ण बाष्प धारण करते तेव्हा नेहमी रात्रीच्या वेळी धुके निर्माण होते. जेव्हा आकाश स्वच्छ असते. जमीन थंड असते तेव्हा जमिनी लगतची हवा थंड होते. या थंड हवेमुळे द्रवीभवन होते आणि हवेमध्ये पाण्याचे लहान थेंब तयार होतात. हे निसर्ग दृश्य, मुख्यत: हिवाळयात दिसून येते. धुळीच्या प्रदूषणामुळे हवा, मोठया प्रमाणात बाष्प धारण करते तेव्हा गर्द धुके निर्माण होते.
 
image
 
वेबसाइट व्यवस्था: पर्यावरण माहीती केन्द्र, महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळ  आरोग्य आणि पर्यावरणवेबलिंक्ससतत विचारले जाणारे प्रश्नसंपर्क डिस्क्लेमर साइट मॅप